The End च पोस्टर


म्हणाली होतीस एकदा 
मीचं सजवून देईन घर 
घराचं जाऊ दे आता 
चमचे मोजायला तरी मदत कर 

पहिल्या पावलासाठी माझ्या 
म्हणे अंगण सजवणार होतीस 
बांध तरी घाल आता त्या 
वाहून गेलेल्या मातीस 

होतीस बिलगली प्रेमाने 
पहिल्या वहिल्या भेटीत 
चिखल लिंपायचा निरर्थक प्रयत्न 
आता भेगाळलेल्या फटीत  

"आहेस न आता ठीक?"
विचारलं होतस कधी कुरवाळून 
पडदा तेवढा आता पाडून जा 
" The End " च पोस्टर माळून  

दोन थेंब कधीतरी 
मीही तुझ्यासाठी होते सांडले
त्याच प्रेमासाठी तुझे हक्क 
माझ्याशी येवून भांडले  

वाटून खाल्लेल्या पोळीची 
शपथ आहे तुला 
दाटलेलं आभाळ कर रिकामं
भरायचे आहेत त्यात नवीन रंग  मला  

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)