Distance doesn't matter


          तिचं बाळ आज सकाळपासून फारच रडवेल झाल होत . डोळ्यांच्या काठावरून पाणी मुसंडी मारून कधी बाहेर येईल काही सांगता न्हवत येत . नदीला पूर आल्यावर काठावरची घर जशी म्हणत असतील तसंच ती ( त्या बाळाची आई ) मनातल्या मनात गणपती बाप्पाला सांगत होती " पाणी  वाढायला नको रे बाप्पा …. थांबव ते काठावरच "
          बाळाचे गट्टू गट्टू झालेले गाल आज लालबुंद झाले होते . चेहराही तसा मऊच होता सकाळपासून . कसातरी करून, नको नको म्हणत  दुधाचा अर्धा पेला संपवला होता बाळराजाने. उरलेल्या अर्ध्या पेल्यासाठी घरभर पळणारी , प्रेमाने नवीन गोष्टी रचून सांगणारी आई … तिच्या डोक्यातल्या गोष्टींचा खजिना संपल्यासारखी ओरडली " पिल्ला … पिऊन घे पटकन " आणि बांध फुटला …. 
          सासरी नांदायला निघालेली नववधू जाताना जशी आईला बिलगून रडते तश्शीच त्याने त्याच्या आईला घट्ट मिठी मारली . खूप काही सांगायचं आहे , बरंच काहीतरी राहून गेलाय मनात पण … सांगायला गेलो तर ओठातल्या शब्दाआधी डोळ्यातल्या धबधब्यानेच उड्या घेतल्या गालांवर . अशी काही अवस्था झाली होती त्या चिमुकल्या जीवाची . 
          तसाच रडून रडून ओल्या पापण्यांनी तो आईच्या कुशीत झोपून गेला . खरंतर ही त्याची झोपेची वेळ न्हवती . उन्ह डोक्यावर आली तरी आई ही उपाशीच . पोटाच्या गोळ्याच्या पोटात काही नाही म्हटल्यावर तिच्यातरी पोटात काय जाईल ? बाळाला झोपेतून उठवायचं धाडसही होईना तिला आज . त्याच्या डोळ्यातलं पाणी , कळवळून काहीतरी सांगू पाहणारा त्याचा चेहरा … काहीच बघायचं न्हवत तिला परत . 
          तास - दोनतास होऊन गेल्यावर शेवटी चिमुकले डोळे उघडले . पण रोजचा खट्याळपणा  , अंगावरून सरकलेल्या रजईत अडकून चेहऱ्यावरून पुसून गेलाय अस वाटत होत . अत्ताशे उघडलेले डोळे घराच्या छताकडे लावून सैर - भैर नजरेने अजूनही काहीतरी शोधत होते .  आईने त्याच्या आवडीची बरीच खेळणी आणून ठेवली त्याच्या समोर. काही काही नको होत आम्हाला आज :(
          त्याला काय हवाय हे सांगता येईना आणि त्याच्या आईला अंदाजही लागेना . म्हणावी तशी तब्बेत ही न्हवती बिघडली आज. आवडीच्या बागेत खेळूनही झालं होत . बाबांनी उठल्या उठल्या खारुताईची भेटही घडवली होती ( खारुताई म्हणजे बाळाच आवडीच कार्टून chip and dale) मग अजून काय राहिलंय ?  
          तोंडात घास न घेता गाल फुगवून , डोळे पाण्याने भरून बसण्याइतक तसं काहीही न्हवत घडल . आजीलाही फोन करून झाला , आवडीची सगळी गाणी म्हणून झाली . तरी स्वारी गप्प गप्प … आणि उपशीही , अजून :'(
डोळ्यातल्या पाण्याला … औषध काय ?
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय ?
          अस काहीस प्रसंगाला साजेस घडून - बिघडवून आई म्हणत होती तोवर तिचा फोन वाजला .  " लाडक्या दिराचा फोन …. आत्ता यावेळी ? ऑफिस ला सुट्टी आहे कि काय आज यांच्या ? " म्हणतच तिने फोन उचलला (दीर ' लाडका ' यासाठी की तिच्यासाठी तो कॉलेजच्या मित्रांहूनही जास्त  मोकळेपणाने वागायचा ). नेहमीच्या सुरवातीच्या गोष्टी सडून, संदर्भ गळून, स्पष्टीकरण रद्द करत  एकदम मुळाला हात घालत काकाने विचारलं " वाहिनी …. बाळ बरा आहे ना ? " दिराचा आवाज एकदम ओढल्यासारखा वाटला . त्यातला कंप फोनवरही स्पष्ट ऐकू येत होता .  
          होय - नाही सारखी औपचारिक उत्तरं देण्यापेक्षा तिने फोन सरळ बाळाला दिला " बोल … काका बोलणार आहेत तुझ्याशी " समुद्राकाठची लाट परत किनाऱ्यावर येउन धडकावी तसा अजून एक हुंदका बाळाच्या ओठातून बाहेर पडला . "काका …" एवढा एकच शब्द बोलता आला त्याला . पुढचे बरेच शब्द त्याच्या हुंदक्यात गुरफटून गेले, डोळ्यातून वाहून गेल. आणि नंतर बराच वेळ दोन्हीकडेही मन चिरत जाणारी शांतता . 
          काका पुतण्या दोघांनीही एकमेकांमधल अंतर कधीच पार केल होत . पिल्लाने काढलेली आठवण ही इतक्या लांबूनही काकाला   दिवसभर अस्वस्थ करायला पुरेशी होती .
          Sometimes, the people who are thousands of miles away from you, can make feel better than people right beside you :) 
          नात्याची वीण घट्ट विणली असेल तर distance does not matter much:)
View Facebook Comments

3 comments:

  1. Awesome !! .... kakanchi aathwan yetey watate aarya la ;)

    ReplyDelete
  2. When I write a new post, I always try to add something more and nice.
    Thanks for all your likes and comments! really appreciate it a lot!! :s Without them it will not be such a lively page!

    It always feels nice to read such a nice comments.

    Special thanks to Amol Pednekar for below nice comment

    " It is very difficult to imprint ones emotions....heart-out............But u manage it beautifully......Beautiful mind mirrored on pages!!!!!!!!! "

    Thanks a lot :)

    ReplyDelete

Thank you for your comment :)