या आईला खरंच नाही कळत काही





या आईला खरंच नाही कळत काही....
 
झोपेतून उठवायची ही वेळ आहे काय ग बाई ?
पहाटे  ५ ला मला भूक लागत नाही
डोळे ताणत … पेंगत कसं जाईल दुध मला
पोटातले बेडूक ओरडायला … मी रात्रभर
दंगा पण नाही केला
या आईला खरंच नाही कळत काही
माझी स्वप्न मोडायची हिला उगाचच रोज घाई

गरम
गरम पोहे खायला लागतो मलाही चमचा
मागितला तर म्हणते कशी " हा आला … फॉरेनर आमचा :) "
सूर लावून मी  जेव्हा ओरडतो " म … मा …. "
तिच्या कपाळाची आठी सांगते " राहूदे इंडिया … तू इथेच हो जमा " :p
या आईला खरंच नाही कळत काही
दारातल लाल tulip ही आमच्या गणपती बाप्पाला वाही


( जर्मनीमध्ये आल्यापासून पिल्लाला खेळायला खडे , वाळू शोधावे लागतात )
२ दिवसांच्या भटकंतीनंतर लागला होता एक खडा हाती
आजीच्या गावी पसरली होती मस्त अंगणभर माती
गार्डनमधल्या वाळूशी ही  सांगते खेळ जपून
टंग … टंग वाल्या बाप्पाला म्हणे नमस्कार नसतो
करायचा झोपून  
(टंग … टंग वाला बाप्पा म्हणजे घराशेजारच चर्च )
या आईला खरंच नाही कळत काही
सगळे बाप्पा एकच… जेव्हा आपल्याला तो छान छान स्माईल देई

बाबांचा Latpot
( laptop ) म्हणजे ऑफिसच काम
मी सुरु करायला गेलो तर ओरडते " भात खा आधी … तू जरा थांब "
शोधून शेवग्याची शेंग मात्र वरणात रोज आणते
Indian supermarket  चा पत्ता अगदी पहिल्या दिवसापासून जाणते   
या आईला खरंच नाही कळत काही
देश तसा वेश … तुझ पिल्लू थोड्या दिवसात खायला लागेल thai :)  

टबमध्ये बाथ तर नाहीच करू देत कधी
थंडी लागेल म्हणून मला स्वेटर चढवते आधी
वासाच क्रीम रोज रोज अंगाला फासते
स्वतः मात्र कॉफी घ्यायला कसं गच्चीत जाऊन बसते ?
या आईला खरंच नाही कळत काही
तिच्यासाठी पिल्लू तीच अजून मोठ झालेलं नाही :)

कडेवर घेऊन फिरताना कधी हिची पाठ नाही दुखली
आता चालायला येतंय आणि मला इथे pram घेतली
बाबाच्या ऑफिस पर्यंत ही रोज जॉगिंग करते
माझी school bag ही अगदी neat and clean भरते
या आईला खरंच नाही कळत काही
खरचं ….
आमच्या दोघांतून हिच्या ब्लॉग ला हिला हल्ली वेळच मिळत नाही :(


8 comments:

Thank you for your comment :)