आता काय कामाचे ?



मी ऐकलंय 

साखरपुडा ठरल्यावर तू रड रड रडलीस 
'त्या' ला ही तू बिना मेकअपचीच पसंत पडलीस 
कवितांची वही सुद्धा म्हणे झाली तुला जड 
फडण्याआधी शेवटची म्हणूनही पाहीली नाहीस धड

थरथरत होता ओठ तुझा पत्ता सासरचा सांगताना 
टीपं गाळत होतीस डोळे मिटून बाळकृष्ण देव्हार्यात रांगताना 
जाळून टाकलेस सगळे ग्रीटींग्स शांतपणे माझे 
जपून ठेवलेले आपल्या सावलीचे फोटो … ते तरी आता काय कामाचे ? 

एक दीर्घ श्वास माझ्या नावचा , त्याला ' हो ' म्हणण्या आधी 
पूर्ण झाली माझ्या शिवाय तुझी निमंत्रितांची यादी
हात जोडून मागीतलीस क्षमा मंगळसूत्रातल्या मण्यांची
सप्तपदीवेळीही आठवण तुला आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची   

विचारलंच असेल नणंदेने, उंबऱ्यावरच ओलांडताना माप
सून म्हणून मला द्याल न मुलगी, जेव्हा व्हाल तुम्ही आई-बाप
कोण सांगेल नवऱ्याला तुझ्या , आवडतो तुला मुलगा ?
बायकोकडे बघून जेव्हा उत्तरला तो " बहिणाबाई …. आज हवं ते मागा :) "

आता फक्त एवढंच शेवटच एकदा सांग 
का मिटलेस डोळे तू कुंकवाने भरताना भांग ?
उघड्या डोळ्यांनी स्वीकारायचं सगळ धाडस ठेव ग बबड्या 
दे फेकून प्रेमाच्या आपल्या त्या तकलादू कुबड्या 
 
 

2 comments:

Thank you for your comment :)