The End च पोस्टर


म्हणाली होतीस एकदा 
मीचं सजवून देईन घर 
घराचं जाऊ दे आता 
चमचे मोजायला तरी मदत कर 

पहिल्या पावलासाठी माझ्या 
म्हणे अंगण सजवणार होतीस 
बांध तरी घाल आता त्या 
वाहून गेलेल्या मातीस 

होतीस बिलगली प्रेमाने 
पहिल्या वहिल्या भेटीत 
चिखल लिंपायचा निरर्थक प्रयत्न 
आता भेगाळलेल्या फटीत  

"आहेस न आता ठीक?"
विचारलं होतस कधी कुरवाळून 
पडदा तेवढा आता पाडून जा 
" The End " च पोस्टर माळून  

दोन थेंब कधीतरी 
मीही तुझ्यासाठी होते सांडले
त्याच प्रेमासाठी तुझे हक्क 
माझ्याशी येवून भांडले  

वाटून खाल्लेल्या पोळीची 
शपथ आहे तुला 
दाटलेलं आभाळ कर रिकामं
भरायचे आहेत त्यात नवीन रंग  मला  

असेल तुझा तो हिरा



बालरूप तुझ्या खोड्या 
बोले शेजारीण मला 
" धाकात ठेव ग जरा,
असेल तुझा तो हिरा "

इवालाल्या हातांनी 
किती कुरवाळशील आई ?
मायेची कोवळी गंगा 
दोन्ही डोळ्यातून वाही 
ओठाच्या पाकळ्यांना 
निजू दे अजून थोडे 
किलबिल बोबड्या शब्दांची 
कसे पळती सुसाट हे घोडे
पेल्यातल्या दुधालाही की रे 
फुटला आता घाम 
पावलांची दुडूदुड बोले 
कान्हा थोडा वेळ थांब

पायात थुई थुई नाचून 
पैंजणाचा नाद थकला 
तुझ्याशी खेळ खेळून 
सुर्यदादा ही क्षितिजाशी झुकला

पेंग अंगाईला आली 
तरी उघडे तुझे टपोरे मोती 
काळोखाच्या कुशीतून चांदण्या 
बघ कृष्णाचा पाळणा गाती 

फुगलेल्या भाकारीमागे 
गेला कुठे तुझा चंदा मामा ?
सगळी तुझी रासलीला 
यशोदेच्या पदराखाली जमा 


  

ए आई मला हौसेत राहू दे

पावसाळा सुरु झाला म्हटलं की पूर्वी चिमुरडी आईकडे चिंब भिजण्यासाठी हट्टुन बसायची . " ए आई मला पावसात जाऊ दे " सारखी गाणी ओठांवर आपोआप ताल धरू लागायची.

पावसाळे सरत गेले तसे भिजायचे हट्टही परतीच्या थेंबा बरोबर परत गेले . दिवस बदलले अन हट्टही

आजची बच्चेकंपनी आईकडे कशासाठी मागे लागतील ?

हे मांडण्याचा एक प्रयत्न " ए आई मला पावसात जाऊ दे " या कवितेच्या विडंबन काव्यातून 


ए आई मला हौसेत राहू दे 
एकदाच ग मोजुनी मला कोल्डड्रिंकचा थेंब थेंब पिऊ दे  

पॉपकॉर्न कसे बघ तडतड उडती 
पिझ्झा डब्यातून मला खुणावती 
बर्गर संगे McD त मज आईस्क्रीमचे थर रचू दे   

फेसबुक वर खुळे साचले 
भिंतीइतके (FB wall) कॉमेंट्स पुरले 
तऱ्हेतऱ्हेच्या कोड्यांची मज फिर्याद ग घेऊ दे ( Criminal Case Game )   

तुझा पिटुकला बघ java वाचतो
Google दादा डोके भरतो
पुस्तकामाधुनी या सगळ्या मजला 'नको'ची आग पेरू दे  
$ खाली उभा राहुनी 
मायेने मी तुडवीन नाणी 
चोर , Income tax , पोलिस , raid कुणी वाट्टेल ते येऊ दे 

View Facebook Comments













मूळ कविता 


ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

खिडकीखाली तळे साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा




ms paint मध्ये अस ठेवलंय काय ?
काळ्या पाटीची सर दुसऱ्या कशालाच  नाय   
की - बोर्ड म्हणजे अहो नुसता बटनांचा मारा 
त्याहून माझा अ - आ - इ - ई चा तक्ताच बरा 
इंग्लिश म्युझिक हवंय कशाला ? 
बस …. आईने पुन्हा एकदा शिवाजीचा पाळणा गावा 
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

३ बी एच के flat  मध्ये असं किती लोळायचंय ? 
खरतर मला दिवाळी किल्ल्याचा मातीत खेळायचय
स्काय डायव्हिंग मध्ये कसल आलय राव थ्रील
घसरगुंडीवरून खाली यायलाच लागत जास्त स्किल
अदिदास चे महागडे शूज नकोय रे मला 
छोटासा लाईट चा बुटच हवा  
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

euro च्या rate शी माझं न देण न घेण 
दिवसभराच्या खाऊसाठी पुरत मला १ रुपयाच नाण 
रेनकोट आणि स्वेटर चा थर कशाला ?
सूर … सू …. र आवाजाचा गारेगार शेकतो की घशाला
इंडिया - जर्मनी - इटली च्या कुणी सांगितल्यात वाऱ्या ?
बरा वाटतो चोर पोलिस खेळणारा गल्लीतला पोरांचा थवा  
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा 
  
विटी दांडू खेळताना होती फोडली आजी ची काच 
भाड्याची सायकल दिवसभर पळवली हातावर टेकवून रुपये ५ ( दर वाढलेत आता …. )
स्विमिंग पूलच्या पाण्याला रंकाळ्याची ऊब कुठली ?
फुटबॉल पेक्षा मज्जा  येते उडवायला डबा एक्स्प्रेस ची बाटली :P 
व्हिडीओ गेम पेक्षा गिफ्ट आणा मला सापशिडीचा बोर्ड नवा 
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

View Facebook Comments 

Graceful... ग्रेस

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

ग्रेस 

Distance doesn't matter


          तिचं बाळ आज सकाळपासून फारच रडवेल झाल होत . डोळ्यांच्या काठावरून पाणी मुसंडी मारून कधी बाहेर येईल काही सांगता न्हवत येत . नदीला पूर आल्यावर काठावरची घर जशी म्हणत असतील तसंच ती ( त्या बाळाची आई ) मनातल्या मनात गणपती बाप्पाला सांगत होती " पाणी  वाढायला नको रे बाप्पा …. थांबव ते काठावरच "
          बाळाचे गट्टू गट्टू झालेले गाल आज लालबुंद झाले होते . चेहराही तसा मऊच होता सकाळपासून . कसातरी करून, नको नको म्हणत  दुधाचा अर्धा पेला संपवला होता बाळराजाने. उरलेल्या अर्ध्या पेल्यासाठी घरभर पळणारी , प्रेमाने नवीन गोष्टी रचून सांगणारी आई … तिच्या डोक्यातल्या गोष्टींचा खजिना संपल्यासारखी ओरडली " पिल्ला … पिऊन घे पटकन " आणि बांध फुटला …. 
          सासरी नांदायला निघालेली नववधू जाताना जशी आईला बिलगून रडते तश्शीच त्याने त्याच्या आईला घट्ट मिठी मारली . खूप काही सांगायचं आहे , बरंच काहीतरी राहून गेलाय मनात पण … सांगायला गेलो तर ओठातल्या शब्दाआधी डोळ्यातल्या धबधब्यानेच उड्या घेतल्या गालांवर . अशी काही अवस्था झाली होती त्या चिमुकल्या जीवाची . 
          तसाच रडून रडून ओल्या पापण्यांनी तो आईच्या कुशीत झोपून गेला . खरंतर ही त्याची झोपेची वेळ न्हवती . उन्ह डोक्यावर आली तरी आई ही उपाशीच . पोटाच्या गोळ्याच्या पोटात काही नाही म्हटल्यावर तिच्यातरी पोटात काय जाईल ? बाळाला झोपेतून उठवायचं धाडसही होईना तिला आज . त्याच्या डोळ्यातलं पाणी , कळवळून काहीतरी सांगू पाहणारा त्याचा चेहरा … काहीच बघायचं न्हवत तिला परत . 
          तास - दोनतास होऊन गेल्यावर शेवटी चिमुकले डोळे उघडले . पण रोजचा खट्याळपणा  , अंगावरून सरकलेल्या रजईत अडकून चेहऱ्यावरून पुसून गेलाय अस वाटत होत . अत्ताशे उघडलेले डोळे घराच्या छताकडे लावून सैर - भैर नजरेने अजूनही काहीतरी शोधत होते .  आईने त्याच्या आवडीची बरीच खेळणी आणून ठेवली त्याच्या समोर. काही काही नको होत आम्हाला आज :(
          त्याला काय हवाय हे सांगता येईना आणि त्याच्या आईला अंदाजही लागेना . म्हणावी तशी तब्बेत ही न्हवती बिघडली आज. आवडीच्या बागेत खेळूनही झालं होत . बाबांनी उठल्या उठल्या खारुताईची भेटही घडवली होती ( खारुताई म्हणजे बाळाच आवडीच कार्टून chip and dale) मग अजून काय राहिलंय ?  
          तोंडात घास न घेता गाल फुगवून , डोळे पाण्याने भरून बसण्याइतक तसं काहीही न्हवत घडल . आजीलाही फोन करून झाला , आवडीची सगळी गाणी म्हणून झाली . तरी स्वारी गप्प गप्प … आणि उपशीही , अजून :'(
डोळ्यातल्या पाण्याला … औषध काय ?
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय ?
          अस काहीस प्रसंगाला साजेस घडून - बिघडवून आई म्हणत होती तोवर तिचा फोन वाजला .  " लाडक्या दिराचा फोन …. आत्ता यावेळी ? ऑफिस ला सुट्टी आहे कि काय आज यांच्या ? " म्हणतच तिने फोन उचलला (दीर ' लाडका ' यासाठी की तिच्यासाठी तो कॉलेजच्या मित्रांहूनही जास्त  मोकळेपणाने वागायचा ). नेहमीच्या सुरवातीच्या गोष्टी सडून, संदर्भ गळून, स्पष्टीकरण रद्द करत  एकदम मुळाला हात घालत काकाने विचारलं " वाहिनी …. बाळ बरा आहे ना ? " दिराचा आवाज एकदम ओढल्यासारखा वाटला . त्यातला कंप फोनवरही स्पष्ट ऐकू येत होता .  
          होय - नाही सारखी औपचारिक उत्तरं देण्यापेक्षा तिने फोन सरळ बाळाला दिला " बोल … काका बोलणार आहेत तुझ्याशी " समुद्राकाठची लाट परत किनाऱ्यावर येउन धडकावी तसा अजून एक हुंदका बाळाच्या ओठातून बाहेर पडला . "काका …" एवढा एकच शब्द बोलता आला त्याला . पुढचे बरेच शब्द त्याच्या हुंदक्यात गुरफटून गेले, डोळ्यातून वाहून गेल. आणि नंतर बराच वेळ दोन्हीकडेही मन चिरत जाणारी शांतता . 
          काका पुतण्या दोघांनीही एकमेकांमधल अंतर कधीच पार केल होत . पिल्लाने काढलेली आठवण ही इतक्या लांबूनही काकाला   दिवसभर अस्वस्थ करायला पुरेशी होती .
          Sometimes, the people who are thousands of miles away from you, can make feel better than people right beside you :) 
          नात्याची वीण घट्ट विणली असेल तर distance does not matter much:)
View Facebook Comments

तरीही आज ठरवलंय ….


ओठावर आलेले शब्द जीभेतच अडखळतात 
आई म्हणे….  मी बोलतच नाही 
चिमुकल्या पावलांना हवेत उडायचं असतं 
म्हणे….  मी चालतच नाही

हवाय फराळ नवीन, नुकत्याच उगवलेल्या दातांना
भिंतीही कमी पडताहेत अभ्यासाला या चिमुकल्या हातांना
काका सांगतो मी हुबेहूब बाबावर गेलोय 
आणि माझी आई म्हणे …. मी आगाऊ झालोय :P 
(बिचारा बाबा …. :D)

वरण भाताच्या शेजारी असतेच शेंगदाण्याची चटणी 
तरीही बाबाच्या ताटात रोज घालतो वाटणी 
एवढू- एवढूश्या पापडात माझ कसतरी करून भागत   
अन आई म्हणे …. मला नुसत चटक - मटक लागत

हिच्या वेणीतल्या फुलासाठी रोज मैलभर धावतो 
म्हणे …. हा सकाळी सकाळी शिकलाय हिंडायला 
उपाशी चिऊशी  माझ्यातले २ घोट " शेअर " करतो 
म्हणे … मस्ती आलीये ह्याला गच्चीत  दुध सांडायला :(  

कधीतरी वाटते म्हणावी आईसाठी ही अंगाई 
तिला तर कधी कुणी थोपटवत पण नाही  
केसातून हात फिरवत जवळ घ्यावं म्हटलं तर 
माझ्याच नीजेची लागलेली असते हिला घाई 

तरीही आज ठरवलंय …. 
हीच जेवण होइतोवर चांदोबाला थांबवायच
टान-टानवाल्या बाप्पाकडून हिच्यासाठी कँडलं घ्यायचं 
पसारा झालाय म्हणून ओरडली तरी चालेल 
पण परवा विसकटलेल हीच कपाट , परत छान लावून द्यायचं :)

(आता माझी आई म्हणेल …. " अरे देवा … तू लावून देणार कपाट , म्हणजे डब्बल काम :D )