रघु - भाग १
संध्याकाळची दिवेलागणीची वेळ , पाऊस तर नुसता धो धो कोसळत होता . कोपऱ्यावर एक वयस्कर बाई कंदील घेऊन उभी . पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडली आणि पावसात अडकली . दूरवर एका झोपडीत तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . पण कुणीही दिसेना .
झोपडीच्या एका फटीतून थोडासा प्रकाश दिसला . वात विझण्याच्या वाटेवर होती . हातातला कंदील वर करून तिले पाहायचा प्रयत्नही केला पण तेवढ्यात ती वाऱ्याशी भांडत इतका वेळ तग धरून बसलेली वातही विझली . काळाकुट अंधार , माळाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या कुत्र्याचा आवाज . बसं … बाकी कुणीच नाही .
म्हातारीला काय करावं सुचेना . पुढे जाऊन पहावं तर भितीने हात कापायला सुरु झाला . अन काही ऐकलंच नाही असं समजून पुढे रस्ता धरावा तर लेकराचा आवाज मागे तिला ओढत होता . बराच वेळ ती नुसतीच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकत उभी राहिली . माळावरच्या भुताखेताच्या बऱ्याच गोष्टी आजवर ऐकल्या होत्या त्या वय झालेल्या कानांनी . कुणी सांगावं खऱ्या असतीलही …… की खरंच कुणा तान्ह्या जीवाचा हंबरडा असेल हा .
शेवटी न राहवून तिने झोपडीच्या दिशेने पहिलं पाऊल धाडसाने उचललं . इवल्याश्या कंदिलाच्या प्रकाशात तिला पायाखालचा रस्ताही धड दिसत न्हवता . हळू हळू थोडा अंदाज घेत ती झोपडीच्या दाराजवळ येउन थांबली आणि बाहेरूनच आवाज दिला "कुणी आहे का आंत ??? का रडतंय बाळ इतकं ? " . पलीकडून कुणीही उत्तर देईना .
कंदील कानाजवळ येईल इतका वर करून तिने झोपडीचा मोडकळीस आलेला दरवाजा उघडला आणि सोमर हे पाहून ती दारातच थांबली . नुकतंच जन्माला आलेलं एक लेकरू अन त्याची माय एकमेकांना बिलगून बसले होते . त्या मुलाचा बाप म्हणवणारा गडी , लेकराला आणि बायकोला आडोसा देऊन उभा होता . कोसळणाऱ्या पावसापासून बचावं करत . तिघेही थंडीने कपात होते . त्या मुलाच्या अंगावर तर एक फाटकी चिंधी कापडही न्हवत . चार ठिकाणी ठिगळ लावलेल्या साडीच्या पदराने त्या माउलीचा त्याला कसबस लपेटून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न सुरु होता .
म्हातारी हे पाहून हबकलीच . आजच्या जमान्यात कुणा तान्ह्याचा जन्म असाही होऊ शकतो ? जन्माला आल्या आल्या जगण्यासाठी लागणाऱ्या उबीसाठीही संघर्ष करावा लागावा . कसलं नशीब घेऊन जन्माला घातलंय वरच्याने याला . पण पुढच्याच क्षणी ती त्याच्या जवळ गेली . अंगात घातलेलं स्वेटर काढून तिने त्या मुलाच्या अंगावर लपेटलं . हातातली काठी समोर उभ्या असलेल्या , म्हातारीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहणाऱ्या बापाकडे दिला . वेदनेत कन्हनाऱ्या त्या आईला आपल्या थरथरनाऱ्या हाताने आधार देत उभी केली . बाळाला कुशीत घेतलं आणि एवढंच बोलली "चला . माझ एवढ मोठ घर रिकाम पडलेलं असताना या मुलाला मी पावसात नाही सोडणार "

मुलाचा बाप तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला . ते पाहून ती म्हणाली "बाबा रे …… एका मुलाचा बाप आहेस आता तू . हात जोडून काय उभा आहेस . छाती आनंदाने भरून आली पाहिजे ." हा हात जोडून उभ राहिलेला ईश्वर म्हणजे इलश्या. आई वडिलानंतर आयुष्यात पहिल्यांदा कुणासमोर तरी हात जोडून , मन खाली घालून उभा होता .
म्हातारीने ईश्वरच्या लेकाला आपल्या घरी नेलं . कडकडीत पाण्याने अंघोळ घातली . आपलं वापरून मऊ झालेलं लुगड चारपदरी अंथरून त्यात त्याला गुंडाळून त्याच्या आईच्या कुशीत झोपवल . स्वतःचा पलंग त्या दिवसापासून तिने ईश्वरच्या बायकोला देऊन टाकला . " बाळ झाल्यानंतरच्या विश्रांती साठीचा पलंग आईने द्यायचा असतो . म्हणून हा माझ्याकडून तुला ग पोरी " म्हणत तिने न कळत एक नवीन नातंही जोडून टाकलं .
पेठ्यारात कुठेतरी जपून ठेवलेला एक सोन्याचा जुना तुकडा काढला . चमचाभर मधात बुडवून तिने त्या सोन्याच्या तुकड्याने बाळाच्या जिभेवर ॐ काढला . म्हणे असं केल्याने बाळाच्या वाणीवर आयुष्यभर सरस्वती वास करते . :) बाळाच्या तोंडात पाण्याचा पहिला घोट या म्हातारीने घातला म्हणून तिचं नाव गंगा आजी
त्या दिवसानंतर जवळ जवळ २ वर्ष ईश्वरच कुटुंब गंगा आजीच्या घरीच राहत होत . ईश्वर आणि त्याची बायको दोघेही दिवसभर पाटलांच्या घरी कामासाठी जायचे . तेव्हा या गंगा आजीनेच सांभाळ केला त्याच्या मुलाचा . " रघु " हे नावही तिनेच ठेवलंय . रघु - म्हणजे भगवान श्रीरामाचे कुटुंब . रघुच्या जन्मावेळी त्याचे माय बाप झोपडीत राहायचे म्हणून गंगा आजीने त्या श्रीरामाच्या कुटुंबातील गोंडस पिल्लाला रघु हे नाव दिलं .
पुढे पाटलांच्या मदतीने इलश्याच गावात एक छोटस घरही झालं . रघु तेव्हा जेमतेम ३ वर्षांचा होता . गंगा आजीच्या हाते त्या घराच्या पायाभरणीची पूजा झाली म्हणून इतकी भरभराट झाली असं इलश्या आणि त्याची बायको अजून सगळ्या गावाला सांगतात .
क्रमशः ………
स्वतःचा पलंग त्या दिवसापासून तिने ईश्वरच्या आईला देऊन टाकला .
ReplyDeleteya vakyat thoda correction lagel ka g? ishwarchya aaila nasav kadachit ithe...
bagh jara.... :)
:) Thanks
Delete