रघु - भाग १
रघु - भाग २
नवीन घराच्या वास्तुशांतीचा मुहूर्त होता त्या दिवशी . सगळ अगदी साधेपणाने चालू असलं तरी लगबग ही होतीच . गंगा आजी एका कोपऱ्यात बसून इलाश्याच्या बायकोला सगळ्या रिती सांगत होती . घर उभं करण्या आधी इलाश्याने एक गायही घेतली होती . याच कारण एकचं, रघुला घरचं ताजं ताजं दुध मिळावं . नवीन घराच्या परसदारी त्या गायीचा गोठा .
सगळी पूजा - अर्चा आटोपल्यावर गंगा आजीने इलाश्याच्या बायकोला गायीचा नैवेद्य भरायला सांगितला . केळीच्या पानावर एका बाजूला तूप भाताची मुदी , वरून जाडसर वरण , सुगरणीच्या हाताच्या कापसाहून मऊ लुसलुशीत पुरण पोळ्या , बेदाणे घालून केलेली शेवयाची खीर , तोंडी लावायला आंब्याच लोणचं , आमसुलाची चटणी , पापड , नेहमीप्रमाणे नैवेद्यात ठरलेली बटाट्याची भाजी , जोडीला मटकीची उसळही , काकडीची कोशिंबीर …… अगदी व्यवस्थित नैवेद्य भरला होता तिने . कुणालाही जेवायला बसायची इच्छा व्हावी असा जेवणाचा बेत.
एका हातात नैवेद्याचं पान अन दुसऱ्या हातात पळीपंचपात्र , डोक्यावरचा पदर सावरत ती गायीचा नैवेद्य घेऊन जायला निघाली. पायऱ्या उतरून खाली आली तोच तिच्या लक्षात आलं की तिने चुलीवर दुध गरम करत ठेवाल होत . आल्या वेगानेच ती परत चुलीजवळ धावली पण ती जायीतोवर निम्म्याहून जास्त दुध उतू गेल होत . गंगा आजी समोरच बसली होती पण तिने भांड उचलून बाजूला केलं नाही . का ? हे रघूच्या आईलाही कळेना .
शेवटी तिच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नाचं उत्तर देत गंगा आजी म्हणाली "पोरी नवीन घर बांधल आहेस . नवा संसार आहे . ज्या चुलीने इतका गोड घास दिला पहिले तिला तृप्त करावं . कधी काही कमी पडत नाही . आणि तसही शुभ कामावेळी दुध उतू जाण चांगल असत असं म्हणतात . काहीतरी चांगली बातमी घेऊन नशीब तुझी वाट बघत बसलंय " . रघुची आई नुसतीच हसली . तिला हे सगळ मनापासून पटलं होत आणि मनातल्या मनात देवाचे आभार मनात होती .
घरात जेष्ठ व्यक्ती असण याच कारणासाठी महत्वाच असत . या अशा गोष्टी फक्त त्यांनाच माहित असतात . आपण जितका आपल्या भल्याचा विचार करतो त्याहूनही जास्त ही मोठी लोकं आपल्यासाठी प्रार्थना करत असतात . असं म्हणतात की आई बाबाची पुण्याई मुलांच्या कमी येते हे कदाचित खरंच असेल आणि ते ही यामुळेच .
उतू गेलेल्या दुधाकडे समाधानाने पाहत नैवेद्याचं ताट हातात घेऊन ती गायीच्या गोठ्याकडे निघाली . गाय , गोठा , ताजं दुध या सगळ्या गोष्टींची किमया फक्त त्यालाच कळते ज्याने ती अनुभवली आहे . सकाळी सकाळी ऐकू येणारा गायीचा हंबरडा , तिच्या शेणाने रोज सरावल जाणार अंगण , त्यावर उठून दिसणारी ती सुरेख , देखणी , पांढरी शुभ्र रांगोळी . गायीला चारा घालताना तिच्या डोळ्यात दिसणारा आपलेपणा , प्रेम . रोज दुध काढताना तिच्याशी चाललेल्या गप्पा , अंघोळ घालताना पाठीवरून हात फिरवल्यावर एक वेगळ्याच प्रकारे हलणारी तिची त्वचा ……सगळ अगदी जवळून पाहील्याशिवाय न उमगणारी गोडी . तिला थोड्या दिवसांनी जनावर म्हणायलाही जीभ धजत नाही इतकी मिसळून जाते ती आपल्या कुटुंबात . कुटुंबाचा एक सदस्य बनून जाते
याचं गायीला रघुची आई रोज चार घालायची . ती खाई तोवर मायेने पाठीवरून हात फिरवत रहायची .देत होती रघूची आई चारा घेऊन येताना दिसली की ही गाय हंबरायला सुरु करायची . पण आज चित्र वेगळच होत . रघुची आई येताना दिसली तरी तिने तिच्याकडे पाहून अगदीच दुर्लक्ष केल्यासारखी मान वळवली . कारण काय समजावं म्हणून नैवेद्याचं ताट हातातच घेऊन रघुची आई गोठ्यात पाहण्यासाठी खाली वाकली आणि तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला काहीच सुचेना .
महिन्या - दीड महिन्याच एक गोंडस कन्यारत्न गायीच्या शेपटाशी खेळत गोठ्यातल्या भाऱ्यावर निवांत पडून होत . अन ती गाय तिला उन्हापासून आडोसा
देत होती. कुणाचं होत ते बाळ , कुणी आणून ठेवलं काहीच समजल नाही .
पण त्या दिवसापासून रघुला एक बहिण मिळाली - भद्रा … गोठ्यात सापडली म्हणून तिचं हेच नाव ठेवल गेल . बेटी म्हणजे धनाची पेटी याचाही प्रत्यय आला इलाश्याला . घर , शेत सगळ दुध दुभात्यान , धान्याच्या राशीने भरून गेल
दोन्ही मुलं नावारूपाला आली . आता दोघे मिळून एक संस्था चालवतात . ज्या वयस्कर लोकांकडे त्यांच्या मुलांनी तोंड फिरवलं अश्या लोकांना आसरा म्हणून आणि ज्या लहानग्यांना आई वडील म्हणजे काय हे कळायच्या आधीच दुरावतात त्यांना कुटुंब म्हणून .
माळावरच्या झोपडीच एका मोठ्या इमारतीत रुपांतर झालाय . आणि त्या झोपडीत जन्माला आलेला त्या इमारतीत जवळ जवळ पन्नास लोकांच कुटुंब चालवतो . गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन सुरु केलेल्या संसाराला समाधानाची फळ लगडलेली असतात . आता इलाश्या , त्याची बायको आणि गंगा आजी तिघे मिळून मुलांच्या प्रगतीची प्रार्थना करतात .
।। इति श्री रघु कथा संपूर्णम ।।
:)
तुम्हा सर्वाना आवडली असेल ही अपेक्षा …

Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)