Aug312012

आज झोपच आली नाही ....

एकाही कोड्याची उकल झाली नाही
गुंतलेली दोन टोकं सोडवता आली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

रात्र दाराशी उभी ,चंद्र उंबऱ्याशी थांबलेला 
पापण्यांची शिंपली बंदच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

वाट पाहताना रस्ता लांबलेला 
पण वळणावरून सदाच आली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

ओंजळ प्रकाशाने भरलेली , दिवा तेवत ठेवलेला 
नंदादीपाची वात मंदच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

पापण्यांच्या काठावर विसावलेले मोती
उठलेल्या तरंगाची लाटच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

कुठे खपली कुठे ओलावा , आत खोलवर दाह
वेदना या जखमेची सहनच झाली नाही
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

Aug312012

वो तो..

वो तो पानी कि बूंद है ,जो आखोसे बरस जाए 
आसू तो वो है 
जो तड़प कर आख में ही रह जाए 

वो प्यार ही क्या, जो लब्जोमे बया हो 
प्यार तो वो है 
जो अखोमे नजर आए 

वो तो बिता हुआ कल है, जो हमसे बिछड़ जाए
यादे तो वो है 
जो  दिलमे प्यास बनकर रह जाए

वो शाम ही क्या, जो यादोमे डूब जाए
शाम तो वो है 
जो यदोसे खुबसूरत नगमे बनाए 

वो तो दहलीज है जो अपनोसे दूर करे
दुरिया तो वो है 
जो हरपल, मिलाने को मजबूर करे

वो रात ही क्या ,जो सपनोमे सो जाये 
रात तो वो है 
जो अन्धेरेमेभी किसीके याद में खो जाए

वो तो हवा है, जो डाली से लिपटी रहे 
बहार तो वो है
जो हर फुलको खिलानेपे मजबूर करे 

वो दिल ही क्या, जिसमे दर्द ना हो 
दिल तो वो है 
जो दर्द में भी मुस्कुराया हो 

Tried something in Hindi. किती जमलंय .... माहीत नाही






 
Aug302012

तुझ्याशिवाय .....

डोळ्यातलं पाणी 
पापण्यांच्या आत जिरवलस
अन हुंदका दाटून आला 
म्हणून  तोन्डा फिरवलस   

पाठमोरा उभा राहून 
असा किती वेळ बोलणार होतास ?
एवढी मोठी कळ
एकट्याने कशी झेलणार होतास ?

लांबच्या वळणावर उभ राहून 
आज मला बघून गेलास 
न सांगताच आज 
कसा निघून गेलास ?

कस वाटल नाही एकदाही 
मागे वळून बघावं 
आठवण म्हणून जाताना 
काहीतरी मागावं 

सवय होती तुझ्या असण्याची 
दिवस पुढे सरकत नाही 
एकाकी रात्रीच्या सोबतीला 
पहाटही  फिरकत नाही 

आठवलं तुझं हसण तरी 
पापण्यांचा बांध नकळत फुटतो 
गालावरून ओघळत सरळ 
ओंजळीत येऊन मिटतो 

शब्दच झाले मुके आज
बोलायलाही सुचलं नाही 
मनातल प्रेम चेहऱ्यापर्यंत झेपावल 
पण दोघांनीही ते वाचल नाही 
पाणावलेले डोळे तुझे 
मला पाहताही आला नाही 
दोन पावलांवर होतास उभा 
तुझ्यासोबत वाहताही आलं नाही 

इतक प्रेम दिलस आज 
माझी ओंजळ भरून गेली 
अन ओंजळीतली सगळी फुल 
मी तुझ्या नावे केली

माझ्यासाठी तू परत ये 
ओझं एकटीला पेलवत नाही 
पायाखाली फुल आहेत 
पण तुझ्याशिवाय चालवत नाही 

Aug282012

आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे

आबांच्या देवबाप्पा ... तुला रोज मोदक देतो 
फक्त सांग, तुझ्या घराचा रस्ता कुठून येतो ?
आई म्हणते उंच उंच ढगात तुझं घर
हातात माझ्या येऊ दे .. मला लवकर मोठ कर 

कित्ती वेळा रे सांगायचं तुला, मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
तुझ्या घराच दार दडलंय या काळ्या ढगाआड 
मोठी मोठी तलवार (वीज) येउ दे, चम चम करत 
म्हातारीच्या गडगडाटाला घाबरणार नाही मी परत   

म्हणे...तुला आवडणाऱ्या सगळ्यांना तू घेऊन जातोस 
खरं सांग , माझ्या आजी आजोबानाही तुझ्यातले एक एक मोदक देतोस ?
आवडत असतील तुला पण मग मी काय करू ?
कुणाच्या बोटाला धरून मी बागेमध्ये फिरू ?

तुझ्या देव्हार्यातली साखर ही, म्हणेन मी आज राहू दे 
आजी आजोबाना मात्र माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे 
वाट पाहत असतील ना ते, माझ्याशी खेळलाय ?
मलाही लागलाय रे आता माझ्या आजी च्या मनातल कळायला  

आजी माझी ओरडल्यावर , बाप्पा तू पण  रडतोस ?
सोन्डेसमोरची दुधाची वाटी रोज न पितास सोडतोस 
आजोबांच्या डोळ्यांना घाबरत जा कधीतरी 
जवळ घेतात आजोबा माझे , कित्ती असतील चिडले तरी 

वाट बघतोय मी, चान्दोमामाच्या उशीवर डोकं ठेवून 
लवकर लवकर स्वप्नात ये , त्या दोघांना घेऊन
बक्षीस म्हणून माझे डूल, तुझ्या मोठ्या मोठ्या कानाला
कसं सांगू आठवण येते 
कारण..
स्वप्नात रोज शिकवते ती मला "आजी आजोबा " म्हणायला 
 
 View facebook comments
Aug272012

बाबांचा बर्थ डे !!!


तरी म्हटलं आई .... जागत का बसली 
इतका उशीर झालाय आणि वाट बघतीये कसली ?
घड्याळाची टिकटिक ऐकतिये मन लावून  
एकटी एकटीच हसतेय , हातात फुलं घेऊन 

म्हणतच होती "बाबांचा बड्डे आलाच कि परवा "
"celebration च काय ते पटकन ठरवा "
आरडा ओरडा कसला , कळू नाही द्यायचं 
chocolate तर झालंच हो , आणखी काय घ्यायचं ?

केक कापायला लावलाय मला  उठवून डोळे चोळत 
बड्डे तर बाबांचा ...अन फुग्यांनी मीच बसलोय खेळत 
इतके सगळे गिफ्ट ?? मी तर बघतच बसलो 
"मोठा झाल्यावर मी पण देईन " म्हणत गालातच हसलो 

काय पाहतोय मी ??? देव बाप्पाच माजिक च झालं
बाबांच्या सगळ्या गिफ्ट्स वर माझं नाव कुठून आलं ?
ये काय पिल्लू कडून ... ते काय आर्य कडून ... सगळ कुणी आणल ?
ह ......हे तर माझ्या मम्माचच काम .... राव आपण हिला मानल 

"From your  little PRINCE " तर सगळ्याच balloon वर लिहिलंय 
माझ्या आईला इतकं खुश .. मी आज पहिल्यांदा पाहिलंय :)
बाबांनीही विचारलं "सौ ... तुमच्याकडून काय ?"
म्हणते कशी ...."मांडीवर बसलेला लाडोबा ... आणि हि त्याची माय" :)
Aug142012

बाबा आज राहू दे office

बाबा आज राहू दे office ... सांगून ठेवतो बघ 
" पिल्लाशी कधी खेळू ? " म्हणतोस ना मग 
का.......य ठेवलंय ऑफिसात , तुलाच माहीत असतं
कित्ती उशिरा येतोस.. तरी म्हणे काम राहिलंय जास्त

सांगून ठेवतो आज तुला सोडणारच नाही 
गेलास तर कट्टी... कध्धी कध्धी कडेवर चढणार नाही 
वाकून वाकून आई कडे काय खुणा करतोस ??
आपल्या दोघांमध्ये उगाच तिला कशाला धरतोस ? 

बाबा आता पुरे रे ... किती काम करशील ?
माहितीये .... दमून दमून छोटूछोटूसा उरशील 
आई म्हणते बांधू आपण बाबांचं घर उन्हात 
वेडीच आहे .. रोज असंच कुजबुजते ही कानात 

कधी कळणार रे बाबा हिला ... सगळ वाटून आपण खातो 
माझ्याच नाही का घरी तू माझ्या बरोबर राहातो  
तुझ्या घासातला एक घास भरवतोस ना रे मला
मग तूच सांग .. मी उन्हात कसा ठेऊ तुला ??

तुझ्या ऑफिसात म्हणे भरपू.......र LATPOT (Laptop) असतात
दिवस भर सगळे नुसते त्यावर खेळत बसतात 
तिथे जाऊन खेळतोसच ना.... मग मी काय घोडं मारलंय ?
बघ ... खेळण्यांच कपाट आज मी तुझ्यासाठीच भरलंय

ऑफिसला बुट्टी ..... :) :)

अरे बाबा ..... खरच कि रे टाकलीस तू sack   
काय हवंय सांग तुला .. देतो सगळ toy rack 
एक सांगु ... काढ आज बाहेर आपली कार 
पाऊस कस्ला पडतोय बघ मस्त धुवाधार 

कशाला ही छत्री ?? चिंब भिजून येऊ 
पळ पळ ... आई बघेल ... तिला नको नेऊ 
दुध बिध सगळ राहू दे आज घरीच 
तुला सांगतो ... पिऊ आज चहा भारी भारीच 

का रे बाबा हळू हळू हसतोस ओठातून ??
गाडी कशाला मागे घेतली अर्ध्या वाटेतून ??
केसातून हात फिरवत आई गच्चीत उभी असते 
खरं सांगु बाबा .... तुझी वाट पाहत ही रोज अशीच उभी असते  :)

कसं........ रे तुला सगळ न सांगता कळत ??  (In "My dad is my hero" style)
आई ने हाक न देता बरं तुझं पाउल मागे वळत :)
मला तर तुमची फार मज्जा मज्जा वाटते
आजी म्हणते ... आई म्हणे तुला ऑफिसमध्येपण भेटते :D 
Aug32012

अग बाई.... तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ??

गोड गोड गालात छान छान खळी
मूड आलाय खेळायचा झोपेच्या वेळी
घोडा घोडा करत गादी फिरून झाली 
डोक्याखालच्या उशीला लाथ मारून गेली 

टपोर्या डोळ्यात मोती मोती हसू 
उठ आई आता अडम - तडम खेळत बसू 
कसे ग तुझे मिटती असे डोळे ? 
कुठे झाली रात्र ..चंद्र माझ्याशीच तर खेळे

म्हणतो कसा "बघ आई , Tiger आलाय Tiger"
चल धावू त्याच्या मागे, खूप मोठं आपल घर 
चिऊ चिऊ चिमणी आली बघ दारात 
चल उठ देऊ तिला तांदूळ भरून परात

दिवस भर माझ्या मागे कशी कशी धावतेस ??
नकोच असत मला दुध , किती प्यायला लावतेस !!
बघ तुझा बिल्डर "आहे काय आवाज...." :) :) 
पितो कि..... छान छान बाऊ (non-veg soup ) मला पाज 

आत्ता कुठे फुटलेत पाय, पळू तरी दे
पण अजून वाटते भिती ... तुझा हात दे
बाबांच्या कडेवरून भूर भूर फिरू 
झालो ना मी मोठा आता रागे नको भरू 

पिल्लू पिल्लू म्हणून सारख किती जवळ घेतेस 
अग बाई.... तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ??
बाबांच्या कडेवर तुझ्याहूनही उंच झालोय 
माझ्या आईचं हसू मी बप्पा कडून घेऊन आलोय