डोळ्यातलं पाणी
पापण्यांच्या आत जिरवलस
अन हुंदका दाटून आला
म्हणून तोन्डा फिरवलस
पाठमोरा उभा राहून
असा किती वेळ बोलणार होतास ?
एवढी मोठी कळ
एकट्याने कशी झेलणार होतास ?
लांबच्या वळणावर उभ राहून
आज मला बघून गेलास
न सांगताच आज
कसा निघून गेलास ?
कस वाटल नाही एकदाही
मागे वळून बघावं
आठवण म्हणून जाताना
काहीतरी मागावं
सवय होती तुझ्या असण्याची
दिवस पुढे सरकत नाही
एकाकी रात्रीच्या सोबतीला
पहाटही फिरकत नाही
आठवलं तुझं हसण तरी
पापण्यांचा बांध नकळत फुटतो
गालावरून ओघळत सरळ
ओंजळीत येऊन मिटतो
शब्दच झाले मुके आज
बोलायलाही सुचलं नाही
मनातल प्रेम चेहऱ्यापर्यंत झेपावल
पण दोघांनीही ते वाचल नाही
पाणावलेले डोळे तुझे
मला पाहताही आला नाही
दोन पावलांवर होतास उभा
तुझ्यासोबत वाहताही आलं नाही
इतक प्रेम दिलस आज
माझी ओंजळ भरून गेली
अन ओंजळीतली सगळी फुल
मी तुझ्या नावे केली
माझ्यासाठी तू परत ये
ओझं एकटीला पेलवत नाही
पायाखाली फुल आहेत
पण तुझ्याशिवाय चालवत नाही
This poem is written on 23-08-2007
ReplyDeleteSome of you may guess it :)