तरी म्हटलं आई .... जागत का बसली
इतका उशीर झालाय आणि वाट बघतीये कसली ?
घड्याळाची टिकटिक ऐकतिये मन लावून
एकटी एकटीच हसतेय , हातात फुलं घेऊन
म्हणतच होती "बाबांचा बड्डे आलाच कि परवा "
"celebration च काय ते पटकन ठरवा "
आरडा ओरडा कसला , कळू नाही द्यायचं
chocolate तर झालंच हो , आणखी काय घ्यायचं ?
केक कापायला लावलाय मला उठवून डोळे चोळत
बड्डे तर बाबांचा ...अन फुग्यांनी मीच बसलोय खेळत
इतके सगळे गिफ्ट ?? मी तर बघतच बसलो
"मोठा झाल्यावर मी पण देईन " म्हणत गालातच हसलो
काय पाहतोय मी ??? देव बाप्पाच माजिक च झालं
बाबांच्या सगळ्या गिफ्ट्स वर माझं नाव कुठून आलं ?
ये काय पिल्लू कडून ... ते काय आर्य कडून ... सगळ कुणी आणल ?
ह ......हे तर माझ्या मम्माचच काम .... राव आपण हिला मानल
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)