कुठल्यातरी एका तालाचा तिला सूरच लागत नाही
देणारा समोर असूनही आज ती काहीच मागत नाही
समोरच्याच आवडण हि तिला सोसाव लागत
उधळलेल प्रेम ... नको असताना पोसावं लागत
मुसुमुसून रडायला , हुंदकाही फुटत नाही
अन खळखळून हसायला , ओठच हलत नाही
गुदमरलेला श्वास , आतल्या आत कोन्डतो
कारण
प्रत्येकजण तिच्यासाठी वेगळा डाव मांडतो
मांडलेल्या डावात , जिंकण ठरलेलंच असत
प्रत्येकजण आज , फक्त तिच्यासाठी हरलेल असत
माथा टेकायाच्या आधीच , आशीर्वादाचा हात उठतो
आकाशातला तारा , फक्त तिच्याच साठी तुटतो
बरसणार प्रत्येक सुख , तिच्याच ओंजळीत पडत
पण दोन हातांची छोटीशी ओंजळ .... इथेच सगळ अडत
एकावेळी म्यानात एकच तलवार बसते
तळपणारी प्रत्येक तलवार , आज तिच्यासाठी तळपत असते
स्वतःची बाग असूनही , आज सगळंच अवघड होऊन बसलंय
कारण
प्रत्येक फुल तिच्याशी आज मनापासून हसलंय
इतकं सगळ मिळूनही
कांती वाऱ्याने शहारलेली
कारण पानगळ होऊनही तिची वेल मात्र
नेहमीप्रमाणे बहरलेली
अशीच एक भावना, जिला शब्दच फुटत नाही
थेंब पापण्यावरच विसावतो , त्याला तरंग ही उठत नाही
प्रत्येक पाकळी तिन , मनापासून जपली
too good..
ReplyDelete@Amrita : Thank you so much :)
ReplyDelete