हे दोनच दिवे पुरले :)


मी अनुभवलेली पहाट ...

शांत सुंदर पहाटे, क्षितिजाला जाग आली 
रंगपंचमीची सुरवात ढगांच्या कडातून झाली 

लवलवत्या पात्यात हिरवळ दाटू  लागली 
पांढऱ्या धुक्याची साय त्यावर साचू लागली 

कोपऱ्यावरची कोकीळ साद घालू लागली 
परसातल्या लाजाळूला आत्ता कुठे शुद्ध आली 

मागू लागला गुलाब मोगऱ्याकडे सुगंध 
परीजातला जागवून गेली हलकी झुळूक मंद 

लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी सूर्यफुलात जन्म घेतला 
पांढऱ्या सदऱ्यातल्या तगारीला मैलावरून खुणावू लागला 








आयुष्याच गणित शिकवायला इतके सगळे तयार झाले
माझे डोळे मात्र , स्वप्नांनी चोरून नेले 

पळून गेलेला चोर कुठून तरी पळून आला 
माझ मला परत करून आपल्या गावी निघून गेला 

अंधुकश्या प्रकाशात मी डोळे उघडले 
जन्मभराची गोष्ट वाचण्यास हे दोनच दिवे पुरले :)

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)