बाबा जरा इकडे ये ...आई कडे बघ
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !
हसून दाखवतेय..... आजीला उगाच
दिसतोय चेहरा जरा वेगळा वेगळाच आज
मी वरण मागितलं कि भात आणून देते
कित्ती नको म्हटलं तरी आज उगाच कडेवर घेते
आळीमिळी गुपचळी नाही आवडत तिला खेळायला
पण घर कस शांत असावं .... जणू आजच लागलाय हिला कळायला
बाबा ... विचार तिला ...मोकळ्या आभाळात कुठे हरवलय तीच जग
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !
काम नाही ..बीम नाही ..कुणाला काहीही वाटो
पाहत बसते Latpot (Laptop) वरचे नुसते तुझे फोटो
खेळली पण नाही आज माझ्याशी घोडा घोडा
गार्डन मध्ये न्यायाची तर गोष्टच सोडा
एकटी एकटी काहीतरी विचार करत बसते
कुणी हात लावला तरी कशी दचकून उठते ?
म्हणते कशी .... दोन टोकांच्या पोकळीतली जाणवतेय धग
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !
कारण बिरण काही नाही .... उगाचच रडते
मी जवळ गेलो तरी , डोळ्यात पाणी काढते
हे काय बर दिसत का ? मला तूच सांग
बघे म्हणे , "कुठल्या कोड्याचा लागतोय का तुला थांग "
घाबरतो तुझा हा strong boy , आई अशी काय बोले
रोजच्या बडबडीतले तिच्या जणू शब्दच उडून गेले
कशाला भिते ? सांग तिला .... जिरवेन मी असे हज्जार नग
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !
बाबा एक खर सांगू ?
दुसर तिसर काही नाही रे ...तिला तुझी आठवण येते
आणि आईच्या ओठावरच हसण , कुठेतरी भूर.... पळवून नेते
नको करू काळजी मित्रा , मी सांभाळून घेईन
(हे सगळ बोलताना , खरच ...बाबाचा बच्चा त्याचा मित्रच झाला )
येत चालता मला आता ,तिला मीच फिरायला नेईन
काळजी बिळजी करत नको बसू तू आमची
मस्त ठेवतो हसत खेळत बायको बघ तुमची
आहे न मी तुझी कार्बन कॉपी .... सगळ कस सांभाळतोय तरी बघ
पळवून लावतो तिच्या डोळ्यातले कोपऱ्यावरचे ढग !
Chhan... :)
ReplyDeleteThank you :)
Delete:s
Delete