आयुष्यातला तो सर्वात कठीण काळ होता माझ्या साठी .... माझ ६ महिन्याचं पिल्लू मी कोल्हापूरला माझ्या आई कडे ठेवून पुण्यात इथे job करत होते. जरी प्रत्येक शनिवारी मी त्याला भेटायला जात असले तरी त्याला सोडून येताना नको नको वाटायचं . वाटायचं हा सोमवार येउच नये कॅलेंडर मध्ये . तोच दिवस
आजचाही सोमवार नेहमीप्रमाणे भल्या पहाटे घड्याळाच्या काट्यावर नाचतच उगवला . सकाळचे ४ वाजले आणि माझ्या मोबाईल मधला कोंबडा आरवला . उठायची अशीही अज्जीबात इच्छा होत न्हवती . पिल्लाशी रात्री २ वाजेपर्यंत खेळत बसले होते . आत्ता कुठे डोळा लागला होता माझा . ह्या घड्याळालाहि इतक जलद आजच पाळायच होत ?
कशेतरी करून डोळे उघडले. पिल्लू चिकटूनच झोपला होता . जीवावरच आल होत त्याला बाजूला सारून उठण. मग मनात विचार आला प्रत्येक सोमवारी leave नाही मिळणार madam आपल्याला . उठ .
"हे" हि अगदी निवांत झोपले होते . साखरझोपेतून उठवायचं मनच होत न्हवत . तरीही उठवलं . दोघेही थोडा वेळ पिल्लुकडे पाहत बसलो . आणि मग एकमेकांना दिलासा देत उठून आवरा आवारी करू लागलो.
५:३० ची बस चुकवायची नाही हे टार्गेट समोर ठेवूनच हात काम आणि वेळ यांची सांगड घालत होते.बेडरूम मध्ये माझ ६ महिन्याचं पिल्लू निवांत स्वप्नातल्या चान्दोमामाशी गप्पा मारत निजल होत. आता पिल्लू उठलं तर? मम्माची चाललेली लगबग बघून आज काय डरकाळी फुटणारे आहे देव जाणे. असा विचार मनात येतो न येतो तोवरच त्याचा आवाज कानावर येउन आदळला . "मम्मा .... भूर ..... ??" (अरे देवा .... ह्याच्या डोक्यात काय माझ्या मनाचा स्कॅनर फिट केलाय काय?). "नाही कुठे जात तुझी मम्मा " म्हणत त्याच्या आजीने त्याला कुशीत घेतलं . साहेबाना थोडी कुणकुण लागलीच होती . आता मम्मा आणि बाबा मला परत आज सोडून कुठेतरी भूर जाणार :(
"तू आवर सामान . मी घेतो त्याला " म्हणत नवरोबांनी त्याला मांडीवर घेतलं. त्याचा एकच प्रश्न "मम्मा .... भूर ..... ??" आईशपथ ... हृदय पिळवटून निघायचं माझ हे सगळ ऐकताना .
"गुड मॉर्निंग शोना . उठल कस माझ pillupack आज इतक्या लवकर ? सकाळ झाल्यावर तुला पोम्पोम मधून फिरवून आणेन हा... अमोल काका येईल न तुला खाऊ घेऊन . रात्र झाली बाळ . झोप लवकर " - बाबा
"उ हु ..." चिरंजीव तोंड फिरवून पलीकडे :(
"पिल्ला ... मम्मा शंभो करून झाली कि येइलच इतक्यात. आम्ही दोघे तुला नवी नवी सायकल घेऊन येतो ह ..." - बाबा
"ना " चिरंजीवांचा कट्टर असहकार
"आज बाबा तुला मोठं एरोप्लेन आणणार आहे " खिंड लढवायचा बाबाचा निकराचा प्रयत्न सुरु होता .
बाथरूमच्या दारावर टकटक .. "साहेब जागे झालेत टक्क ... वातावरण तापणार असा वाटतंय सौ ." - बाबांचं मम्मा ला रिपोर्टिंग . मम्मा आताच अर्धी गार झाली
आता मला मैदानात उतरण्यावाचून पर्याय नाही हे जाणून मी त्याची समजून काढायला पुढे झाले . कंठापर्यंत आलेला हुंदका पहिले गिळून घेतला. नवरोबानीही जवळ घेत थोडासा धीर दिला .
"मम्मा चा पिल्लू शाहन आहे .. गोड गोड हसून दाखवत . रडायचं नाही न ? आजी आणि आबा आहेत न बरोबर . मी लग्गेच येणार उद्या परत ". "हो… आणि आम्ही किनई तिकडे आईसक्रीम पण खाणार आहोत. बाबा आणि मम्माला नाहीच." आज्जीही मदतीला धावली.
एव्हाना पिल्लाच्या डोळ्यांत पूर दाटलेला. नजरेत फसवलं गेल्याचं दुःख स्पष्ट दिसून येतंय. मम्मा खोटं बोलतेय याचा न पेलवणारा ताण काही सांगू पाहतोय. पण…..मम्माच्या डोळ्याच्या ओल्या कडा पाहून माझ पिल्लू एका मिनिटात तयार झाल मला सोडायला .
आजोबा हात हलवून म्हणत होते "don't worry ." आणि आम्ही दोघे जड पावलांनी पायऱ्या उतरत होतो . गाडीत बसून ह्यांच्या मांडीवर डोक ठेवून मनसोक्त रडून घेतलं मी . त्यांना तर हे हि करण शक्य न्हवत. बायकोला आधार देणारा वड ढासळता कामा नये :'(
सकाळ होइतोवर कदाचित तो (माझ pillupack ) विसरेल हि हे सगळ . पुढच्या शनिवारी मी दारात उभी दिसले कि त्याच आनंदाने तो येईल झेप घेत माझ्या कडे . आत्ता या क्षणी त्याची मम्मा आणि बाबा त्याच्या जवळ आहेत इतकच त्याला माहित असेल आणि त्यातच तो खुश असेल . लहान मुलांना सगळ जग आई बाबाच्या कुशीत मिळत .
देवबाप्पा .... कुठून रे इतका समजूतदारपणा दिलास माझ्या लेकाला ?
Thanks to Ashish Pednekar and Amol Pednekar for support
ReplyDeleteGreat
ReplyDeleteThank you so much :)
Deleteएव्हाना पिल्लाच्या डोळ्यांत पूर दाटलेला. नजरेत फसवलं गेल्याचं दुःख स्पष्ट दिसून येतंय. मम्मा खोटं बोलतेय याचा न पेलवणारा ताण काही सांगू पाहतोय. पण…..मम्माच्या डोळ्याच्या ओल्या कडा पाहून माझ पिल्लू एका मिनिटात तयार झाल मला सोडायला . .......
ReplyDeleteawesome lines.......................simply gr8
best regards, Ganesh
Thank you Ganesh :)
Delete