तू मात्र अशीच .....

          त्या दोघी मैत्रिणी .....मैत्रिणी ? न्हवत्याच कधी ... मैत्रीचा एकही मागमूस कधी दिसला नाही . न कधी भेटन , न कधी फोनवरच ते तासनतास बोलन , कधी कुणाजवळ विचारपूस नाही , कधी कुणाजवळ आठवण काढण नाही . पण तरीही ... त्या दोघी एका धाग्याने बांधल्या गेल्या होत्या . दोघींचाही मित्र एकच.
          एकीसाठी तो म्हणजे सर्वस्व  आणि त्याच्यासाठीही ती म्हणजे त्याच जग. आणि दुसरी .... नको म्हणतोय तर कुठल्या घोड्यावर बसू ? :) तिघांचही तस बरं चालल होत. काय झालं बिनसलं आणि रथाच तिसर चाक निखळून पडलं . निखळून कसलं पडतंय ? काढून टाकण्यात आलं . त्यान दुसर्या मैत्रीनिसाठीच्या सगळ्या वाटा  बंद करून टाकल्या ... कुणालाच त्रास नको . 
          या सगळ्याच कारण विचारायला वेळच दिला नाही. आणि त्याच्या 'तिला' ही पडलेल हे कोड ... शेवटपर्यंत कोडच राहील. ती त्याला सर्वस्व मानायची . तिच्यासाठी त्याचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य . एका शब्दानही प्रश्न न करता तिन हि हे सगळ समजून घेतलं . अन त्या क्षणापासून दोघी मैत्रिणी पात्राच्या दोन टोकांना गेल्या . जी कधीही एकत्र येण शक्य न्हवत.
          अधूनमधून पहिल्या मैत्रिणीलाही वाटायचं , लांबूनच का होईना पण बघून घ्यावं तिला डोळे भरून. गळ्यात गळे घालून फिरण्याइतकी प्रिय जरी नसली ती .. तरीही कुठेतरी एक धागा अजून मजबूत होता.जो दोघीनाही एकत्र आणायला पाहत होता . देवाने बहाल केलेलं एक अनोख वरदान .. दोघींच्याही लेखणीतून सरस्वती उमटत होती.   
          रथाच निखळून पडलेल चाक (दुरावलेली दुसरी मैत्रीण) रथाच्याच गतीने शेजाशेजारूनच चालत होत इतके दिवस. सरस्वतीच्या एका हाताला हि आणि दुसर्या हाताला ती. दोघीही भन्नाट लिहायच्या. वाचणार्यान वाचताच बसावं.इतक्या दिवसात कधीही दोघीनाही एकमेकींचा हेवा वाटला नाही. स्पर्धा करावीशीही नाही वाटली कधी.
          स्पर्धा ? इथच आज खर घोड अडलं . रथाची दोन चाक आनंदान चालत होती. तो आणि त्याची ती पहिली मैत्रीण . तिसर सुटलेलं चाक ( दुरावलेली दुसरी )अगदी व्यवस्थित संभाळल होत. तिच्या पावलाशी पाऊल जोडत .  तिच्या चालीशी आपली गती जुळवत .. कळत नकळत कठलाही धागा तुटू  न देत. आणि अचानक हे सगळ स्पर्धेवर कुठून गेल ?     
         त्या सुटलेल्या चाकाच एक एक पाऊल पुढे पडत गेल . आणि अंतर वाढत गेल . दोघे एकीकडे आणि तिसरी एकीकडे.
कोण काय करणार ? पावला पावलांनी पुढे धावण्यापेक्षा पाऊल जुळवत एकाच लयीत चाललेलं सगळ, सुटलेल्या चाकानच हलवून सोडलं . हरवल्या ..... सरस्वतीच्या दोन लेकी विनाकारण तुटल्या 

एका शब्दावर सगळच दुरावल होत 
एका हाकेतल सगळच हरवल होत 
तरी मी सगळ सावरून घेतलं 
तू मात्र अशीच .....  
माझ्या बोलण्याने तुला अजूनही काहीच फरक पडत नाही 
किती सांभाळून घेतलं , तरी तुझ पाऊल काय मागे पडत नाही 

कितीतरी दिवस झाले .. आठवतंय?
दोघीही पावलाला पाऊल जुळवून चालत होतो 
तुझी लेखणी माझी लेखणी ... दोन्ही समान रेषेत झेलत होतो 
तू मात्र अशीच .....
नकळत हात सोडून पुढे निघून गेलीस 
तुलाच ठाऊक ... कुठल्या race चा करंडक घेऊन आलीस ?

अंतराने अंतर वाढत जाईल 
तुझ मन नकळत तुलाच विनाकारण कुढत राहील 
" बालमैत्रिण " बरोबर आहेस असच वाटत राहील मला 
तू मात्र अशीच .....
कुणाची आठवण आली म्हणूनच घराबाहेर पडलीस 
अन मी गुफलेली सगळी वीण स्वतःच्या हाताने तोडलीस 

सोडून दिलाय मी ही दोर , आता पुन्हा जुळणे नाही 
दोन लेखाणीना एक लय आता पुन्हा मिळणे नाही 
फक्त इतकच वाटतंय .... बरोबर चालायला हवी होतीस 
दुरावलेली असो... पण प्रत्येक प्रतिभेतून तू मला नवी होतीस 
तू मात्र अशीच .....
माझ्याशी रस्सीखेच , हाच तुझा गुन्हा आहे 
तुझा हा वेडेपणा आम्हा दोघांसाठीही जुना आहे :)


  






या कथेतील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही; आढळल्यास योगायोग समजावा.

3 comments:

  1. अवघड भाषेत लिहिलंय थोड ... :k

    ReplyDelete
  2. I guessed all characters correctly ...ssshhh..... koi hai

    ReplyDelete

Thank you for your comment :)