14-03-2007
डोळ्यातला प्रत्येक थेंब ,पापणीवर दाटू लागतो
My college days were golden days due to her. She was a single person in my life for whom I could do anything.
One day ... unexpectedly ... she left me alone, broken my heart ... I was feeling just like I was missing my valuable part.
This poem was written when I was trying to search my lost friend inside her ...again..
डोळ्यातला प्रत्येक थेंब ,पापणीवर दाटू लागतो
खरच....
मोगर्याचा दरवळही,नकोसा वाटू लागतो
ओलावलेल्या कडा ,सांत्वन मागत नाहीत
अवसेच्या रात्री ,मग चांदण्याही जागत नाहीत
वाहणाऱ्या वार्याला, गारवाही बोचू लागतो
आपलेपणा दोघींमधला ,नको इतका बोचू लागतो
खरखुर प्रेम, तिन साखळदंडानी बांधल होत
सुटत चाललेल्या धाग्यांना ,नकळत सांधल होत
गाठींचा गुंताही तिने,मनात जपला होता
म्हणे...
वेदनेचा दाह त्यात लपला होता
कुणाच्यातरी शब्दांनी, घाव केला होता
भावनेच्या बाजारात प्रेमाचा तिच्या, इथे भाव केला होता
विखुरलेल्या तुकड्यांनी ,स्वतः च्या हातानी वेचल
अन कोसळलेल आभाळ मी ,पुन्हा एकदा रचल
तुटलेलं जुळत नाही ,दुरावलेल मिळत नाही
सगळ कळत असूनही, माझ मन वळत नाही
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)