वेळेआधी पोहोचलास तू
गाडीलाच यायला उशीर झाला
पण उशीर झाला म्हणून ओरडणार
शेजारी कुणीच न्हवत
घड्याळाचा आवाज कान देऊन ऐक
बघ माझी आठवण येते का
खिडकीतून शिरणारा वारा
आज अंगाशी झोंबेल
अन येऊन तो कापाळाशी थांबेल
खेळू दे त्याला तुझ्या केसांशी
विस्कटलेल्या केसातून एकदा हात फिरव
बघ माझी आठवण येते का
मग तू हातांच्या बोटांकडे पहा
पण हातात धरून ठेवायला
कोणाचाच हात नसेल
अवलालेल्या मुठीत कुठेतरी उब जाणवेल
बघ माझी आठवण येते का
अंधारात वाट चुकल्यासारखा
सैरभैर होशील
आठवणींच्या रस्त्यावर हरवून जाशील
मग स्वतःलाच एक प्रश्न विचार
"घर कधी येणार रे ?"
बघ माझी आठवण येते का
झोपायला जाशील तेव्हा आठव
कुणीतरी तुझी वाट पाहताय
पण कुशीत शिरायला आज
कोणच नसेल
"झोप आलीये रे मला "
फक्त एकदा म्हण
बघ माझी आठवण येते का
गरम हवेने तुझा जीव
कासावीस होईल
पण तुझ्या हक्काचा गारवा आज
तुला मिळणार नाही
डोळे बंद कर आणि ओठांच्या पाकळ्या उघड
बघ माझी आठवण येते का
रात्री अचानक जाग येईल
"झोपलाय बघ कसा " हे आठवून
स्वतःशीच हसशील
पण जवळ घ्यायला कोणाच नसेल
ओल्या पायांनी पावलांना स्पर्श कर
बघ माझी आठवण येते का
सकाळी थोडी उशीरच जाग येईल
उठायचं तसा आळसच येईल
"झोप अजून थोडावेळ " सांगायला
आज कोणाच नसेल
थोडावेळ अंथरुणात लोळून काढ
बघ माझी आठवण येते का
डोळ्यात साठलेल्या पाण्याला आता
गालांवर ओघळू दे
वात फार तपालीये
आज मेणाला पाघळू दे
भरलेल्या डोळ्यांनी आरशासमोर उभा रहा
बघ माझी आठवण येते का
एकटीला ठेवून गेलास
रिकामी माझी ओंजळ
पाण्याने भरून दिलास
अन थांबलेल्या हुंदक्यानं
छोटासा रस्ता केलास
अश्रुनी भिजलेल्या मातीत
तुला दोन पावलं दिसतील
एकदा निरखून पहा
ती तुझ्याकडेच येत असतील
बघ माझी आठवण येते का
NOTE
Inspiration by http://marathikavitaa.blogspot.in/2008/06/blog-post_3921.html
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)