आजपर्यंत त्या झाडाकडे
खुपदा वळून पाहिलं होतं
त्याच्याच सावलीला माझ मन
एकदा विसाव्याला राहील होतं
प्रत्येक फांदीच प्रत्येक पान
अजूनही बघून हसत
एकटी दिसल्यावर मी
सोबतीला येऊन बसत
का कुणास ठाऊक
पण मला नेहमी वाटत
आठवणींच कोवळ उन
मला याच सावलीत मिळत
याच झाडाचा सुगंध
हरवलेलं सगळ परत करेल
माझ्या डोळ्यातले मोती
माझ्याच ओंजळीत भरेल
नात्यांची वीण बांधायला
या फुलांनी शिकवलं
विखुरलेलं सांधायच कस
हे हि त्यांनीच दाखवलं
कारण ....
एकदा वीण सुटत गेली
कि सारी नाती तुटत जातात
नात्यातले घट्ट बंधही
अलगद सुटत जातात
म्हणूनच पुन्हा वळून
पाहीली ती सावली
सुटत चाललेली वीण
जिन मला बांधायला लावली
भरदुपारी आज सावली
झाडाच्या पारावर बसली होती
आठवणींचा फुललेला वसंत पाहून
माझ्याशी मुक्यानेच हसली होती
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)