नको विचारू रंग फुलाचा
वळणावरच्या वठलेल्या झाडाला
ऐकवू नको विजयी इतिहास
बुरुज ढासळलेल्या विद्रूप गडाला
मागू नको प्रेमासाठी सुगंध
विरहात रडणाऱ्या पारिजाताच्या झाडाला
सांगू नको तुझी प्रेम कहाणी
गावाबाहेरच्या एकाकी वाडयाला
नको देवू गाणी पावसाची
रणरणत्या उन्हात तापलेल्या रेतीला
दाखवू नको शीतल चांदण
दिव्याबरोबर जळणाऱ्या वातीला
नको विचारू गाभार्यातल्या देवाला
ओठापर्यंत येऊन थांबलेल्या शब्दाचा अर्थ
शब्दांच्याही पुढचा एक जग असत
शब्दांचा खेळ हा सारा व्यर्थ
दुखाचा डोन्गर सुखाची राई
प्रयत्न नको करू सोडवण्याचा
फुललेला वसंत आज न उद्या जाणारच
अट्टाहास नको त्याला अडवण्याचा
शेवटपर्यंत साद घाल
उंच आकाश कुठेतरी वाकेल
सुटेल हा भावनांचा गुंता
जिथे तुझा माथा टेकेल
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)