पक्षांचा किलबिलाट
दिवसभर त्या झाडावर होता
दिवसभर त्या झाडावर होता
आणि त्याच्याच सावलीत
रात्री मोगरा फुलला होता
संथ वाहणाऱ्या वाऱ्याला
जरा जास्तच वेग होता
सुगंधासाठी मोगार्याकडे
तो गयावया करत होता
मस्तक हलवून उडत जात
हसत हसत गावातच पात
त्याच्या प्रीतीसाठी मात्र
विशाल रेगीस्तान जळत राहत
पानांची सळसळ
भंगत होती शांतता
निजलेली चिऊपिल्ले
वाऱ्याची अंगाई ऐकता
शीतल चांदणे धरणीवर
चंद्र आकाशात
काळोख हा पसरला
तो एकटाच प्रकाशात
हवी होती सोबत
म्हनुन् त्याने हात पुढे केला
नि माझं हात आज
अलगद वर झाला
खरच तो हात
तिथे पोहोचायला हवं होता
चंद्र माझ्या हाती
लागायला हवा होता
चांदण्यांचा आयुष्य
जागून बघितलं असत
एका क्षणासाठी का होईना
आकाश अनुभवलं असत
तरीही हा चंद्र
माझ्यासाठी आज पुन्हा उगवला
त्यावेळी झालेला अश्रूंचा उल्कापात
आणि तो मातीत विरल्यावर
फुललेला मोगरा
खरच .....
हे बघायला आज
चंद्राबरोबर तू ही हवा होतास
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)