विश्वनिर्मात्याला खुपदा धन्यवाद द्यावेसे वाटतात मला मुलगी बनवल्याबद्दल. बरयाच गोष्टी नाही करता येत मुलांसारख्या हे मान्य . पण तरीही ... मुलगी म्हणजे ... विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्नं पडाव ... अशी निर्मिती ..
एक पायरी जास्त चढले असते
प्रत्येक युद्ध दिमाखात लढले असते
मित्राच्या खांद्यावर मनसोक्त रडले असते
कॉलेज कट्ट्यावर नोटस काढले असते
खरच....
मुलगा असते तर
दिवस असेच काढले असते
कुणावर तरी मनापासून प्रेम केला असतं
रोज एकदातरी तिला फिरायला नेलं असतं
अभ्यासावरच लक्षही उडून गेला असत
valentine day ला छानस rose दिला असत
सोडून जाताना तिला डोळ्यात पाणीही आला असत
खरच....
मुलगा असते तर
हे असच झालं असत
रात्री १२ वाजता Birthday cake कापला असता
आई न मग मला चांगलाच झापला असता
कुणाचा तरी फोटो पाकिटात जपला असता
मागे उभा राहून नकळत तिचा केस ही मापला असता
डोळ्यातला थेंब पापणीच्या आताच लपला असता
खरच....
मुलगा असते तर
कुठलाही वार झेपला असता
प्रत्येक ट्रेकिंग चा आनंद लुटला असता
स्वर्ग मला चार पावलावर भेटला असता
election ला माझा ही silencer फुटला असता
कोसळणार पाऊस असा ओंजळीत राहिला नसता
चिंब भिजताना आणखीच सुन्दर वाटला असता
खरच....
मुलगा असते तर
माझा वारू असच सुटला असता
Bike ही खूप fast चालवली असती
मित्रांच्या गप्पात रात्र घालवली असती
कुणाच्यातरी आठवणीत सायंकाळ मालवली असती
मनगटातल्या बळावर कुंडलीही हलवली असती
खरच....
मुलगा असते तर
सगळी ओझी पेलवली असती
सगळे डाव अगदी मनापासून खेळले असते
कधीतरी bat शी माझे ही सूर जुळले असते
कुठल्याही गलक्यात अगदी सहजपणे रुळले असते
Exam ला जाताना कितीतरी chapters गाळले असते
पण आजच्यासारखे तेव्हाही topper पण पाळले असते
खरच....
मुलगा असते तर
आयुष्यातले कण न कण चाळले असते
आवडलेल्या मैत्रिणीसाठी बाबांकडे हट्ट केला असता
आई ला तिचा फोटो दाखवायला नेलं असता
तिच्या सोबतीसाठी माझा हात पुढे झालं असता
तिला आवडीचा perfume gift दिला असता
यशासाठी तिच्या देवाकडे नवस केल असता
खरच....
मुलगा असते तर
माझा प्रेमविवाहाच झालं असता
बाहेर पडताना उम्बरयातून पाय थांबला नसता
आईच्या डोळ्यात पाहताना माझा श्वास लांबला नसता
नजरेचा तीर कुणाचाही मला कधीच झोंबला नसता
शब्दाचा प्रत्येक वार कनकीसारखा तिम्बला असता
क्षितिजाला स्पर्शायला हात कितीही लांबला असता
खरच....
मुलगा असते तर
काळ माझ्यासाठी थांबला असता
आजही वाटत..
मुलगा झाले असते तर
खर स्वातंत्र्य पाहिलं असत
मनापासून एक फुल
देवाला वाहील असत
पोर्णिमेच आकाश
यशाच्या चांदण्यात न्हाल असत
पण....
आजच्यासारख कदाचित आयुष्य
इतका सुंदर राहिलं नसत
खरच....
मुलगा असते तर
निळाशार आकाश कधीच
निराभ्रपणे पाहिलं नसत
साखरझोपेतल एक सुंदरस स्वप्नं
अर्ध्यावरच राहील असत
खरच....
मुलगा असते तर
:)
ReplyDelete