निरभ्र आकाश घेऊन पहाट जन्माला यावी आणि ऐन मध्यानीला सूर्य झाकाळला जावा . इतका निस्तेज आहे का माझा सूर्य ? इतका कमकुवत झालाय का माझा मन ?
हजार पारंब्यांनी जमिनीशी नळ जोडून क्षितीजाचाही अंत शोधणारा माझा वटवृक्ष . पण बुन्द्याशी बिलगलेला सायलीचा वेळ खुडल्यावर उन्मळून पडावा तसा निश्चल आणि निपचित पडलाय . असा का ? ज्या वाऱ्याशी स्पर्धा करून त्याला वावटळीतल्या पाचोळ्या सारखा उडवून लावलं, त्याच वाऱ्याशी आणखी एकदा स्पर्धा करायचा मोहच कसा होत नाही ?
मन .... समुद्राहून खोल .... हक्काचे मोती शोधायला त्याचा कोपरा न कोपरा पिंजून काढला होता . आठवतात ला ते शुभ्र मोती ? भिजलेल्या पावसाच्या ओल्याचिंब पाठीवरून सूर्य किरणांनी स्पर्श केल्यावर नखशिखांत उठलेला शहारा ..... आणि त्याचा झालेला तो इंद्रधनू ... इतक्याच .... कदाचित त्यापेक्षाही जास्त मोहकपणे त्या मोत्यांची माळ गुंफली होती . हौसेचा किनारा गाठणं तर राहू देच पण एक औपचारिकता म्हणूनही ती माळ पुन्हा घालावीशी नाही वाटत. इतका परकेपण ???? इतका एकटेपणा ????
परिसराचा मौन म्हणजे एकांत आणि कुटुंबात राहून एकट वाटणं म्हणजे एकाकीपणा. पण ज्याचा कुटुंबच हरवलाय त्याने काय करायचं ? एका किनाऱ्यावर मी नी दुसऱ्या किनाऱ्यावर माझा घर.... मधल्या डोहाला पोहून पार करायला एकही होडी नाही. पोहूनच पार करायचं म्हटलं तर बुडायची भीती नाही. पण एखादा कालिया फणा काढून समोर उभा राहिला तर त्याच्या विषाने अपवित्र होण्याचा धोकाच जास्त वाटतोय .
रडून लालबुंद झालेला सूर्य
गालावरून ओघळणारी पावसाची सर
ओंजळीत अश्रू वेचायला
समुद्राशी वाकलेलं क्षितीज
अन किनाऱ्याची सीमा ओलांडून
लाटेसरशी येणारा हुंदका
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा
रात्रभर तेवणारी नंदादीपाची वात
साथीला जगणारी अवसेची रात
प्रकाश वेचायला मिटलेल्या
तळहाताची ओंजळ
अन श्वासाच्या लयीत
फडफडणारी एकटीच ज्योत
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा
वार्धक्याकडे झुकलेलं झाड
आयुष्यभर जवळ राहिलेली
त्याची सावली
पिकलेल्या पानाचा वाकलेला देठ
अन हलक्याश्या वार्यात
विरलेला शेवटचा श्वास
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा
घरट बांधणारी दोन पाखरं
हळुवार गुंफलेला एकेक धागा
पिलाला भरवायला आतुर
आईची चोच
अन अगदी हक्काने घरट मोडणारा
मुसळधार पाउस
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा
रात्रीच्या आकाशात छोटासा तारा
त्यावर जीव ओवाळून टाकणारा चंद्र
रात्रभर रंगलेल्या गप्पांचा
चढलेला रंग
अन अंधार चिरत जाणार
विजेचा कडकडती हास्य
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा
मिटलेल्या डोळ्यांची मखमली रजई
पापण्यांशी लपंडाव खेळणारी धुंद झोप
पहाटेच्या पडद्याआड लपलेला
एक गोंडस स्वप्नं
अन ढगांनी अचानक झाकालालेल्ला
उगवतीचा सूर्य

Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)