चंद्राला सोबत म्हणून
डोळे रोज जागतात
लुकलुकणाऱ्या तार्याप्रमाणे
का वेड्यासारखे वागतात ?
चांदण्यांशी गप्पा मारत
रात्र कधी सरलीये का ?
पहाटेच्या सूर्यासाठी
कधीतरी ती उरलीये का ?
हरवलेल्या रात्रीमुळे
उजाडायच अडलंय का ?
क्षितिजावरचा सूर्य विचारतोय
"प्रेमात कुणी पडलय का ?"
पारिजाताचा सदा पाहून
रोज वाईट वाटत
का कुणास ठाऊक पण
डोळ्यात पाणी साठत
प्रत्येक फुलासाठी रडून
आजतरी पाणी थांबलय का ?
एकाचा तरी आयुश्य
क्षणभरासाठी तरी लांबलय का ?
झाडापासून वेगळा होऊन
एकतरी फुल साडलय का ?
झाडावरच फुल विचारताय
"प्रेमात कुणी पडलय का ?"
तलावाच्या काठाला
पाय रोज वळतात
काठावरची सगळी गुपित
जणू त्याला कळतात
तलावात खडे मारून
संध्याकाळ संपेल का ?
मारलेल्या खड्यामुळे
तलाव कधी चिडलाय का ?
पाण्यावरचा तरंग विचारतोय
"प्रेमात कुणी पडलय का ?"
'तिच्या' फक्त होकारासाठी
खरच 'त्याच ' अडलंय का ?
गालावरची खळी कधी
तिच्यासाठी खुललीये का ?
रातराणी डोळ्यातली
खरच कधी फुलालीये का ?
ओठ्वारच गाण त्याने
तिच्यासाठी खुडलय का ?
आपल्या ओंजळीतल सुख
तिच्या ओंजळीत सोडलंय का ?
गोन्धळलेल मन विचारतंय
"प्रेमात कुणी पडलय का ?"
प्रत्येकाचा एकाच प्रश्न
"प्रेमात कुणी पडलय का ?"
या ओठांचा एकाच उत्तर
प्रेमाशिवाय कोणाच अडलंय का ?
सगळ्यांनी विचारण्याइतक
काहीतरी घडलंय का ?
कुणाच्यातरी विरहात कुणाच
मन कधी रडलाय का ?
ओठावरच हास्य विचारतंय
"प्रेमात कुणी पडलय का ?"
पण .....
न झेपणारे घाव
कधीही कुणी झेलू नये
न पेलणार गुपित
कुणासमोरही बोलू नये
उघड्या डोळ्यांनी प्रेम कराव
न बंद डोळ्यांनी आठवावं
आठवणींच उठलेलं वादळ
डोळ्यातच साठवावं
कधीतरी 'ती' समोर येवून
सुंदरस हसेल
तिचं हे हसण आज
फक्त त्याच्यासाठी असेल
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)