चारचौघात बसून बोलताना
शब्दानाही तोलाव लागत
ओठापर्यंत आलेल तुझ नाव
ओठावरच झेलाव लागत
निघालाच विषय तुझा
तरी मला बोलता येत नाही
मुक्याने बरसणार चांदण
पण मला वेचता येत नाही
बोलणारा बोलत जातो
आठवणींची गाठ सोडत जातो
अन अश्रूंचा तो नाजूक बांध
बघता बघता मोडत जातो
तरीही प्रत्येक थेंब
डोळ्यातच जिरवावा लागतो
सरावाचाच धडा
पुन्हा एकदा गिरवावा लागतो
मला एकटीला गाठून हा थेंब
धबधब्यासारखा कोसळतो
आठवणीचा शांत समुद्र
नको इतका उसळतो
बाहेर रणरणत उन
मी मात्र भिजलेली
कारण पेटलेली प्रत्येक ज्योत
तुझ्या पावसात येऊन विझलेली
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)