मनातल्या गोष्टी मनातच ठेवून
मनापासून हसल्यावर
हासुद्धा भासच वाटतो
आपल माणूस समोर दिसल्यावर
मनातली वेदना मनातच जपून
मनापासून रडल्यावर
नको इतक रिकाम वाटत
भरलेलं आकाश पडल्यावर
मनातला राग मनातच धरून
मनापासून रुसल्यावर
पुन्हा एकदा रुसावस वाटत
समजूत घालणार कुणी असल्यावर
मनातली भीती मनातच लपवून
मनापासून घाबरल्यावर
रोजचाच काळोख दाटल्यासारखा वाटतो
कुणीच सोबत नसल्यावर
मनातल प्रेम मनातच साठवून
मनापासून प्रेम केल्यावर
सगळेच भोवती जमल्यासारखे वाटतात
सगळ्यांपासून दूर गेल्यावर
सगळ्याच भावना मनात गुंफून
मनापासून विणाल्यावर
जरीकाट उजळल्यासारखा वाटतो
भोगल आयुष्य डोळ्यासमोरून सरल्यावर
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)