पाय पोळला पायात
निखार्याच अंथरून
परी सांगे हा निखारा
पोरी चाल सावरून
पोळलेला पाय तुझा
नाही होणार सहन
टाक पाऊल पुढचं
काळजीच हे चालण
धगधगती धरित्री
वर आकाश तापल
मधल्या या पोकळीला
लाही कळणार काय ?
नको सोबत शोधूस
एकट्याच हे चालण
एकट्यानं चालायचं
आपापल सावरून
नसे कुणाला सुतक
कुठल्याश्या मयताच
नको फिरुस माघारी
ऐटदार तुझी चाल
चार लोक वळतील
नको मिळवू नजर
कुणासाठीतरी जप
तुझ्या नजरेची धार
तापलेला हा निखारा
तुझा तूच कर शांत
काचेच हे घर तुझ
त्याला दगडी कुंपण
जप तुझ्या या काचेला
त्याला हिर्याची चकाकी
जरी तापला निखारा
हिरा जळणार नाही
~ अमृता
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)